अशी पाखरे येती .

Wednesday, July 25, 2012

एक कथा- ५ ( शेवटचा भाग)


माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो नां? जी गोष्ट सहज मिळत असते, ती नको असते, आणि एखादी गोष्ट थोडी हाताबाहेर जाते म्हंटल्यावर मात्र ती हवी हवीशी वाटते! रीनाला काल पर्यंत रोहनन जेंव्हा इथुन जाईल तेंव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दलची वाईट इमेज नसावी, केवळ इतकीच इच्छा होती. पण आज मात्र जेंव्हा शितलची इंटीमसी थॊडी जास्त वाटली, तेंव्हा मात्र उगिच काहीतरी मिस होतंय तसं वाटणं सुरु झालं होतं.
प्रत्येक गोष्टीचं SWOT ऍनॅलिसिस करून निर्णय घेण्याची पध्दत पर्सनल आयुष्यात पण वापरा असं सर एमबीए च्या क्लासमधे नेहेमी म्हणायचे. पण खरंच ते शक्य आहे कां?? रोहन चा साधा सरळ स्वभाव तिला कालपासून जास्त अपिल होत होता. उगिच मनातल्या मनात कम्पॅरिझन केली जात होती, रोहन आणि गौरवची.. कधी गौरवचं पारडं जड, तर कधी रोहनचं !
रीनाला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, की आपण हा असा विचार का करतोय? शितलच्या घरी जेंव्हा ती दुपारी गेली होती, तेंव्हा शितलची रोहन बरोबरची जवळीक बघुन तिला तिथुन रोहनने निघुन यावं असं वाटत होतं. आपल्याला असं कां होतंय?  रोहनसोबत ती काल दिवसभर ( जवळपास) होती, पण एकदाही रोहनचा ऍप्रोच तसा नव्हता. सहेतुक स्पर्श एकदा पण झाला नव्हता रोहनचा. त्याच्या सज्जनपणाची ही पावतीच समजायची कां??
अचानक रोहन बद्दल वेगळं फिलिंग डेव्हलप होणं सुरु झालं होतं तिच्या मनात . आपण प्रेमात तर नाही ना पडलो रोहनच्या?? तिच्या मनात एक विचार आला, आणि तितक्याच त्वेशाने तो तिने झटकून टाकला. कसं शक्य आहे?? मी एक बिई + एमबीए होतकरू विद्यार्थिनी, आणि तो केवळ एम ए !! कसं शक्य आहे आपण त्याच्या प्रेमात पडणं?? प्रेमात पडतांना अशा गोष्टींचा विचार केला जात नाही, हे तिला आज जाणवलं.
बरेचदा काही गोष्टी आपोआप होत असतात. प्रेम पण त्यातलंच. पण त्याने असं काय केलं की आपल्याला त्याच्याबद्द्ल जवळीक वाटते आहे? काही समजत नव्हतं तिला. असूया ही फक्त प्रेमात पडल्यावरच वाटते. कदाचित म्हणुनच शितल जेंव्हा त्याच्याशी मोकळेपणाने वागत होती, तेंव्हा चिडचीड होत होती आपली.
रोहन-शितल ला बघून किंवा शितल चा रोहनमधला इंटरेस्ट बघुन तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो की काय असं वाटत होतं.
*********************
जेवणाची वेळ झाली होती. शितलची  सुरुवातीला   रोहनशी बोलण्याची  इच्छा नव्हतीच.. जे काही  बोलणं सुरु होतं,  ते केवळ लेलेंच्या सांगण्यावरूनच. पण जेंव्हा रोहन गप्पा टप्पा सुरु झाल्या, तेंव्हा मात्र तिला त्याची बौद्धीक चुणूक चांगलीच जाणवली होती. तिला आठवलं की, रोहन दहावीला असतांना बोर्डात राज्यातुन पाचवा आला होता! कसं विसरलो होतो आपण हे??  नंतरचे शिक्षण पण त्याने गावातच आर्ट्स कॉलेज मधेच घेतले होते, कदाचित त्यामुळे थोडा बुजरा झाला असेल तो. पण मराठी मधे एम ए करून त्याची पुढची झेप मात्र वाखाणण्यासारखी होती. त्याचं अफाट जनरल नॉलेज पाहून तर ती आवाकच झाली होती. एक मन तर म्हणत होतं की ठिक आहे, करू या लग्नं.. काय हरकत आहे, तर दुसरं मन अजूनही एम एस मधेच गुंतलेलं होतं.
बरं,   केवळ वडिलांचे म्हणणे टाळायचे नाही म्हणून त्याच्याशी बोलणं सुरु केलं होतं, पण त्याचं बोलण्याच्या ओघात जेंव्हा त्याचा आयक्यु समजला, तेंव्हा मात्र ती खूप इम्प्रेस झाली – आणि नकळतच त्याच्या प्रेमात पडली- की ही एक कॅल्क्युलेटीव्ह स्टेप घेतली आपण? शितल स्वतःशीच विचार करु लागली.
प्रत्येक गोष्टीमधे कॅलक्युलेशन्स करुन निर्णय घ्यायची तिची नेहेमीची पध्दत इथे मात्र नापास झाल्यासारखे जाणवत होते तिलाच. इतक्या लवकर लग्न वगैरे करुन घर सांभाळण्यापेक्षा अमेरिकेत जाऊन एमएस करावे, आणि लग्नाचे काय ते नंतर बघावे असे तिला वाटत होते. पण दुसरं मन वडिलांच्या इच्छेविरुध्द काही करण्यास तयार नव्हतं.. काय करावं??
******************************************
रोहन दोघींच्या समोर बसला होता. रीना कडे पहाण्याचा दृष्टीकोन आता मात्र थोडा वेगळा झाला होता. ती आवडायला लागली होती. तिच्या बद्दल साशा जेंव्हा बोलली, तेंव्हाच तिच्या बद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट निर्माण झाला होता त्याच्या मनात. सौंदर्याच्या बाबतीत तर काहीच प्रश्न नव्हता. ती होतीच सुंदर !!
शितल चे त्याच्याशी वागणे थोडे खटकत होते रीनाला. आता इतक्या वर्षांच्यानंतर भॆटतोय आपण, पण बाल मित्र म्हंटलं तरीही तिची वागणूक अतिशय फ्री वाटत होती रोहनला. सारखं जाणवत होतं, की तिला काहीतरी नक्कीच माहिती आहे, जे इतर कोणालाही माहिती नाही- आणि म्हणूनच तर ती इतकी मोकळी वागत नाही नां आपल्याशी?? कालच लेले पण गावाहून परत आलेत!!! दॅट क्लिअर्स द मॅटर!!! रोहनच्या एकदम सगळं काही लक्षात आलं. :) रोहन स्वतःशीच हसला.
*******************************************
लेले वाट बघत होते की रोहन आणि शितल एकमेकांना पसंत करतात का ह्याची. जर त्या दोघांचं लग्न झालं तर सगळी काळजी मिटणार होती त्यांची नाहीतर………………………??
रोहन उद्या रात्री परत जाणार होता. मेडीकल टेस्ट झाल्यावर. तो पर्यंत त्याच्या मनाचा अंदाज घेता आला तर बरं होईल, असंही त्यांना वाटत होतं.  शितलला नाही  म्हणण्यासारखं काहीच नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं.. आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला.
*******************************************
सुमाताई संध्याकाळपासून थोड्या चिंतेतच होत्या. परवाच्या रीनाच्या उशिरा येण्यामुळे झालेला त्यांच्या मनावरचं मळभ  काही पुर्ण पणे उतरलं नव्हतं . रोहिणी मधे जाउन नांव नोंदवायचं… हे त्यांनी दोन दिवसात दहा पेक्षा जास्त वेळा चितळ्य़ांना सांगितलं, पण चितळ्य़ांनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं. ते म्हणत होते, आधी एमबिए होऊन जाउ दे, नंतर मग काय ते बघु!!
काल रात्री जेंव्हा रीना – रोहन परत  घरी आले, तेंव्हापासून  रीनाच्या वागण्या,बोलण्यातून ती रोहनकडे आकृष्ट झाल्याचे सुमाताईंना जाणवत होते. त्यामूळे रोहन लवकर गेला तर बरं!! अशी इच्छा होत होती. आता हीच गोष्ट जर चितळ्यांना सांगितली, तर ते उडवुन लावतील, आणि वेड्यात काढतील, म्हणतिल, ’काविळ झालं की सगळंच पिवळं दिसतं’..सुस्कार सोडला, आणि सरळ आपलया खोलित जाउन त्या पलंगावर आडव्या पडल्या. उद्या रोहनसमोरच या गोष्टीचा निकाल लावू असे त्यांनी मनात ठरवले.
****************************************************
रीना ठरल्याप्रमाणे रोहनला घेउन सिनेमाला गेली शितलला पण चल म्हंटलं, पण तिचा अभ्यास होता. येतांना मल्टिप्लेक्स मधेच स्नॅक्स हादडून आल्याने घरी आल्यावर जेवायचं वगैरे काहीच नव्हतं. रीना कार चालवत होती. एकदम तिने कार थांबवली आणि  रीनाने निर्णय घेतला, आधिच उशीर झाला आहे आणि आता आणखी होण्या आधि आपल्या मनात काय आहे ते रोहनला सांगून टाकावं.  पण पुन्हा ऍक्सिलरेट करुन त्याला जे सांगायचं  ते सांगण्याचा  विचार बदलला.
वि. स. खांडॆकरांनी म्हंटलं आहेच , की थोडं अविचारी व्हा, म्हणजेच काहीतरी निर्णय घ्याल, अन्यथा, नु्सता विचारच करीत रहाल. रात्री जेवण झाल्यावर ती रोहनच्या खोलीत गेली. रोहन नेहेमीसारखा पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. रीनाने रागाने ते पुस्तक काढून घेतले आणि म्हणाली, ’एक सुंदर मुलगी समोर उभी असताना तुला हे रटाळ पुस्तक वाचावसच कसे वाटते?”
रोहन गालातल्या गालात हसत म्हणाला, ’सुंदर मुलगी – कुठे आहे गं ती? मला  नाही दिसली ती’-
रीना वैतागली आणि त्याला मारायला घावली त्याच्या अंगावर…. अगं… अगं.. थांब जरा… !!! रीनाच्या नजरेतले भाव बघुन त्याला समजलं की तिला काय म्हणायचंय ते.  रोहन म्हणाला,’ ठिक आहे, मान्य की एक सुंदर मुलगी समोर आहे,   मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?-  त्याच्या या बोलण्यावर रीनाची नजर जमी्निकडे वळली. अन ती नासी फडकेच्या नायिके प्रमाणे अंगठ्याने जमिनीचे नसलेले पोपडे काढण्याचा प्रयत्न करणे सुरु केले .
रीना त्याच्या समोर  जावून बसली, डोळ्यानी जमिनीकडेच पहात म्हणाली, “रोहन?”
रीना कडे पहात  रोहन म्हणाला, – खरंच??
रीना म्हणाली.. होSSSSSSS!
रोहन म्हणाला “जी गोष्ट तुला इतके वर्षात सांगू शकलो नाही ती किती पटकन सांगितलीस तू?? “
रोहन खूप आनंदात होता आज, त्याला त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती,   ती आज मिळाली होती.   रात्रभर त्याला झोप लागली नाही, कधि एकदा आईला ही गोष्ट सांगतो असे त्याला झाले होते.
*****************************************
सकाळी नेहेमीसारखे सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर नाष्टा करत होते. सुमाताई मनातल्या गोष्टी कशा बोलायच्या याची जुळवा जुळव करत होत्या.
काहि तरी बोलायचे म्हणून चितळ्यांनी रोहनला विचारले, अरे रोहन तुझ्या इंटरव्ह्युचं पुढे काय झालं? तू परत कधी जाणार गावी? जर तिकडे सिलेक्शन झाले नसेल तर मला सांग, मी बघतो  ,मला काही करता येइल काय ते. अगदी कुठेच शक्य झाले नाही तर मात्र मी काहीतरी सोय करतो आमच्या कंपनीत.
रोहन काही बोलला नाही. फक्त म्हणाला की बहुतेक काही गरज पडणार नाही.
सुमाताईंनी आपल्या मनातले विचार मनातच ठेवले, उलट खुश झाल्या मनोमन की आता रोहन परत जाणार म्हणून.. रीनाला  खूप उदास वाटत होतं, आपलं त्याच्यावर प्रेम आहे, कालच लक्षात आलं , ते उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.
ब्रेकफास्ट टेबलवरची प्रत्येक व्यक्तीच्या मनात निरनिराळे विचार सुरु होते. .
*****************************************
रोहनने नंतर गावी फोन करून, रीनाबद्दल त्याला काय वाटते ते भैयासाहेबांना सांगितले. ते सुद्धा आश्चर्यचकित झाले, हा गेलाय ईंटरव्ह्यु   द्यायला आणि बातमी काय सांगतोय. एक मन आनंदात होत आणि दुसर मन खात होतं मित्राला दिलेला शब्द मोडावा लागणार म्हणून. आता लेलेला काय सांगावं बरं??
**********************************************
रोहनची मेडीकल टेस्ट झाली आणि रीझल्ट यायला अवकाश असल्याने तो गावाला निघुन गेला.रोहन घरी गेल्याला, आता दोन दिवस होऊन गेले होते. लेले कधी नव्हे ते चितळ्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले,
चितळेतुमच्या मुलीने आमचा आय  एस जावई पळवला हो….
चितळे म्हणाले? आय ए एस जावई?आणि माझ्या मुलीने पळवला?
म्हणजे तुम्हाला माहिती नव्हते ?? अहो रोहन इथे आय ए एस च्या इंटरव्ह्यु साठी आला होता. रिटन एक्झाम पास झाला होताच तो, फक्त इंटरव्ह्यु बाकी होता, तो द्यायला इथे आला होता तो. आता लवकरच कुठेतरी कलेक्टर म्हणून जॉइन करेल तो.मी गावी गेलो होतो, तेंव्हा  भैय्यासाहेबांशी बोललो होतो. ते पण तयार होते शितलला सून करुन घ्यायला. शितलला पण तो आवडला होताच, पण रोहनने भैय्यासाहेबांना घरी सांगितलं की त्याला रीनाशी लग्नं करायचंय म्हणून.. आणि रीनाची पण हरकत नाही म्हणाला तो..
चितळ्यांना हा शॉक ऑफ द लाइफ होता. आनंदाने  त्यांनी लेलेंना मिठीच मारली.सुमाताइंना म्हणाले , की रीनाचे लग्न ठरवले हो, तिने…. सुमा ताई बोलणं ऐकतच होत्या, त्यांनाही खूप आ्नंद झालेला होता. पोरीनं नशिब् काढलंय होSSSS!  म्हणत त्या देवापुढे साखर ठेवायला गेल्या.
रीना हे सगळं बोलणं उभं राहून ऐकत होती.. आणि  खुश झालेल्या रीनाला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.ती आत पळाली रोहनला फोन करन खुश खबर द्यायला.


 महेंद्र कुलकर्णी

एक कथा- ४


रोहन आपण समुद्रावर जाउ या का?व्हाय नॉटशुअर.. चालेल मलादोघंही बँडस्टँडला पोहोचलेदाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथेफिरत होताआजुबाजुला कुठेही नजर गेलीतरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलंदिसत होतंएक वेळ तुम्हाला जर पहायची लाज वाटत असेलतर तुम्ही डॊळॆ बंद कराअशी प्रवृत्ती दिसुनयेत होती बसलेल्यांची.ह्या भैय्या लोकांना बरोबर समजतं की कोणासमोर जाऊन उभं रहावं तेअगदीरंगात आलेल्या जोडप्यासमोर उभं राहून ते ‘सिंग चाहिए क्या?’म्हणुन विचारतात.. आणि मग नंतर तेकपललवकर जा रे बाबाम्हणुन नको असतांना पण दाणे विकत घेते.
गेले दोन दिवस रोहन घरात होतातरीही रीना त्याच्याशी काहीच बोलली नव्हतीम्हणजे तसा वेळचमिळाला नव्हताप्रत्येक वेळेस रोहन कडे दुर्लक्ष करुनच रीना निघून गेली होतीएका खडकावर जाउनबसण्यापेक्षा त्यांनी किनाऱ्यापासून थोडं जवळंच बसणं पसंत केलंतेवढ्यात रीना ची मैत्रीण साशा तिच्याबॉय फ्रेंड बरोबर आलीरीना ला तिथे बसलेली बसून ती एकदम चमकलीचपण सोबत रोहन ला बघून मात्रएकदम म्हणाली
’काय गं रीनानेहेमी म्हणतेस ना की माझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे नाही म्हणून’मग आता हा तो कोण ?’हॅंड्सम आहे बरं कां , एकदम मॅनलीआवडला बरं का मला पणरीना कांही बोलण्याच्या आताच तीआपल्या बॉय फ्रेंडला म्हणाली.. ही रीना आहे नांएक नंबरची काकू बाई आहेनेहेमी सांगते की ती कधीचअफेअर वगैरे करणार नाहीकिंवा कोणी बॉय फ्रेंड वगैरे पण नाही तिचातिचे मित्र मैत्रिणी आहेत बरेचअरेगृपमधे पण असून नसल्यासारखीच असते बरं कां. ’ ओके रिनाएंजॉय युवरसेल्फ ,मी निघते गं.
रोहनला कल्चरल डिफरन्स चा शॉक तर कालच मिळाला होतातिच्या रात्री उशिरा येण्याच्या धक्क्या पेक्षातिच्या बद्दल साशा ने जे बोलली त्याचा धक्का खूप जास्त बसला होता रोहनलात्याला वाटत होतं की रीनाही अतीशय फॉर्वर्ड हाय फाय टाइपची मुलगी आहेपण साशाच्या कॉमेंटमुळे हे लक्षात आलं की रीना अगदीडाउन टु अर्थ मुलगी आहेकेवळ फॅशनेबल कपडे घालते किंवा मोठया शहरात रहाते म्हणुन रीना वाईट ठरुशकत नाही.—-आणि त्याला उगिच बरं वाटलं..
रोहन म्हणालाअगं ती वाईट काय बोलली तुलाती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल?? पण रीनाचंरडणं काही थांबत नव्हतंरीना चे डोळे पुसायला आपला हातरुमाल पुढे केला रोहननेबराच वेळ गुडघ्यातमान घालून बसली होती ती.
रोहनने विषय बदलायचा म्हणून तिच्याशी गप्पा मारणं सुरु केलंकाल रात्री उशिरा घरी आल्यामुळे आई जेरागावलीआणि काल पासून मनाला बोचत असलेला तो गौरव एपीसोड बद्दल जो पर्यंत रोहनला आपण खरंकाय ते सांगत नाही तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती.
रोहनला पण कालपासून हाच प्रश्न सतावत होता की ती का रडत होती?? शेवटी मनाचा हिय्या करून त्यानेविचारलेच, ’ काल रात्री काय झाले होते – का रडत होतीस तू?” एवढं विचारायचीच देरकी रीना जी रडायचीथांबली होती ती पुन्हा एकदा रडू लागलीरोहनला काय करावं ते कळंत नव्हतंशेवटी त्याने हिम्मत करूनतिच्या खांद्यावर हात ठेउन तिचे सांत्वन केलेतरीपण तिचे रडणे काही कमी होत नव्हते.
शेवटी बऱ्याच वेळा नंतर रीना शांत झाली आणि तिने गौरव बद्दल तिला वाटणारं अट्रॅक्शन , त्त्यानंतर च्याकालच्या बिहेविअर बद्दल सांगितलंआणि उशिर का झाला हे पण सांगितलंरोहन म्हणाला, ’इतकीकाळजी करण्यासारखं नाही तेअसं होतंच असतं या वयात.’ एखाद्या मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटणं सहाजीकआहे.त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.
रोहन म्हणालातुला आठवतं कांलहान असतांना पण खेळतांना भांडणं झाली की तू अशीच रडायचीसमाझ्या जवळ येऊन.. रीना ने वर पाहिलं.. डोळ्यातुन निघालेल्या अश्रूंमुळे चेहेरा खूप उतरल्या सारखादिसत होतापण लहानपणीच्या आठवणीने हसूं आलं चेहेऱ्यावर.
भैय्यासाहेब जोशी आणि राजशेखर चितळे बाल मित्र असल्यामुळे मुलांची म्हणजे रीना आणि रोहन वगैरेची भेट लहानपणी नेहेमीच होत होतीराजशेखर यांचे आई वडील जिवंत असतांना अगदी नित्य नेमाने तेकोंकणात जायचेरोहन, रीना, शितल हे सगळे  अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेले. एकमेकांशी असलेली ओळख आणि त्यामुळे असलेला संबंधातला सहजपणा होता. रीना आणि शितल शहरातरहाणाऱ्याम्हणून त्यांच्या वागण्याबोलण्यात थोडा जास्त स्मार्टनेस होतारोहन नेहेमीच रिसिव्हींग एंडलाच असायचा.जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवुन हसु फुटलं ्दोघांनाही..
रीना चमकलीआणि तिने रोहनच्या डोळ्यात बघीतलंनजरेला नजर मिळाली.. आणि तिला त्याच्यानजरेतला सच्चे पणा लक्षात आलारोहनच्या पण  बोलताच लक्षात आलं की तिला काय म्हणायचंय ते –की त्याचा गैरसमज झालाय? रीनाला अजूनही नक्की समजलं नव्हतं की काय होतंय ते.
थोड्यावेळाने तिथुन उठुन दोघेही परत निघाले घरी जायलाजाता जाता रोहनला घेऊन ती मित्रांकडे गेलीहोतीमित्रांच्या गृपमधे थोडावेळ थांबून परत ती दोघंही घरी पोहोचली.गृपच्या मुलांना तिने रोहन हाबालमित्र म्हणून ओळख करुन दिली , जेंव्हा सगळ्यामित्रांना तो कोंकणातून एका लहानशा गावातून आलाय हे लक्षात आल्यावर मात्र त्याच्याकडे दुर्लक्षंच करणे पसंत केले. जेंव्हा रोहनला अव्हाइड केलं जात आहे हे लक्षात आले, तेंव्हा तिने पण लवकरच काढता पाय घेतला आणि दोघंही घरी आले. 
रोहनचा मुक्काम दोन दिवस वाढला होताआता उद्याच्या दिवस घरी काढला की मग परवा मेडीकल टेस्ट..आणि मग झालं!!!
*******************************
लेले परत मुंबईला पोहोचले होतेरात्रीचे दहा वाजले होतेरोहन शेजारी चितळेंच्या घरी आहे , हे त्यांनामाहिती होतेचत्याला उद्या घरी बोलावायचे जेवायला.. हे त्यांनी पक्के केले होतेचितळेंच्या घरी फोनकेला ( शेजारी घर असून सुध्दाआणि रोहनला दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे निमंत्रण दिलेरोहन ने नाहीम्हणण्याचा बराच प्रयत्न केलापण लेलेंनी फारच आग्रह केला म्हणून हो म्हंटले.
दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवणाचे नक्की झालेवेळ होती एक वाजताची… शितल ला पण आधिच सांगितलेरोहन बद्दल- आणि त्याच्या वडिलांशी झालेल्या बोलण्याबद्दल. हे पण सांगितलं की रोहनला हे ठाउक नाही. शितल आणि रोहनची भेट घालून द्यावी आणि मग बघावं काय होतं ते.. असा विचार केला होता लेलेंनी.
घरी शितलला आधीपासुन सांगितलं  रोहन बद्दल  त्यांनी त्यांचं झालेलं बोलणं  .तू रोहनला बघ, आणि मग नंतरच काय तो निर्णय घे. अगं रोहनसारखा मुलगा तुला शोधुन पण सापडणार नाही. तुझं एम एस वगैरे बाजुला ठेव आणि थंड डॊक्याने विचार कर की तुला काय हवंय ते!! शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा!! तरीपण रोहन जेंव्हा उद्या दुपारी घरी येईल तेंव्हा घरी रहायचं कबूल केलं तिने,. त्याला भेटु आणि नंतर मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.
**********************************
सकाळी ्रोहन  उठून  तयार झाला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर जाउन बसला . रीना पण आधीपासूनच येउन बसली होती. रोहन कडे तिने पाहिले, आणि  लक्षात आलं की रोहन  आज टेन्शनफ्री बर्ड सारखा प्रफुल्लीत दिसत होता. हलकेच हसली ती त्याच्याकडे बघुन.चितळेंनी विचारले की इंटरव्ह्यु कसा झाला?
रोहन म्हणाला, की इंटरव्ह्यु छान  झालाय, आणि परवा मेडीकल आहे . त्या मुळे इथला मुक्का एक दिवस वाढ्वावा लागतोय. हे पण सांगितलं की लेलेंचा फोन आला होता , आणि त्यांनी पण आज जेवायला  बोलावलंय दुपारी.   चितळेंना आश्चर्य वाटले, पण त्यांनी ते दिसू दिले नाही चेहेऱ्यावर. पण तू रहाणार घरीच बरं कां.. आणि ही ऑर्डर समज हवं तर.. !
***********************************
रोहन दुपारी लेलेंच्या घरी गेला. शितल पण त्याला बघुन खुप खूष झाली. बा्लपणीचा मित्र भेटल्यावर आनंद होणारच.. रोहनला पण शितलचा मोकळा स्वभाव खूप आवडला. शितल चा सेन्स ऑफ ह्युमर खुपच स्ट्रॉंग होता. अगदी लहान गोष्टींवार पण ती   जोक्स क्रॅक करीत होती. रोहन मनातल्या   ,मनात रीना आणि शितलची कम्पॅरिझन करू लागला.
शितल चा मनमोकळा स्वभाव पण त्याला आवडून गेला होता, पण रीनाचा डाउनटुअर्थ टाईपचे कॅरेक्टर पण  मनाला भिडले, रीना दिसते टफ, पण आहे अगदी  मऊ.. मुलायम स्वभावाची. उगिच स्वतःला टफ दाखवायचा प्रयत्न करते , हे त्याच्या लक्षात आलं होतं. काल तर पुन्हा हा पण संशय येत होता की तिला पण आपण  आवडतो की काय? तीची कालची बॅंडस्टॅंड वरुन उठल्यानंतरची देह बोली एकदम वेगळी झालेली होती.
रोहन बरोबर  दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं होतं रीना ने. ती शितल कडे गेली , रोहनला बोलवायला. शितल आणि रोहन सोफ्यावर बसून गपा मारीत होते. रीना पण समोर बसली .शितलचे मनमोकळे वागणे तिला आज आवडत नव्हते. रोहनशी बोलतांना टाळी दे म्हणून तिने साधा हात जरी रोहन समोर केला , तरीही ती अस्वस्थ होत होती. ….
शितलला पण रोहनमधे इंटरेस्ट डेव्हलप होत होता. कॅल्क्युलेटीव्ह रिस्क म्हणजे रोहनशी लग्न हे तिच्या पक्कं लक्षात आलं होतं. हो म्हणायला हरकत ना्ही…