एक प्रेमकथा
आयुषच्या हातात डॉक्टरांनी एक फॉर्म दिलाय,त्यावर आयुषला योग्य तो निर्णय घेऊन सही करायचीय.त्याच्या समोर त्याची भावि पत्नी गिरीजा,आई आणि वडील जखमी अवस्थेत दिसताहेत.
.
.
गिरीजा आणि आयुषचं प्रेम हे आयुषच्या आईवडीलां ना मान्य होतं.तेगिरीजाला सुन म्हणुन स्वीकारायला आनंदाने तयार होते.त्यामुळे चौरासिया बिल्डीँगमध्ये असणार्या त्यांच्या फ्लॅटमध्ये गिरीजाचं येणं जाणं म्हणजे अगदी नॉर्मलच होतं.त्या दिवशी आयुष जॉब वरुन अजुन घरी यायचा होता,पण आईंना मदत करण्यासाठी गिरीजा आधीच आली होती.अचानक बिल्डींगमध्ये धावपळ सुरु झाली.गिरीजा खिडकीतुन बाहेर पाहते तर बिल्डींगचा वरचा भाग कोसळत असलेला तिला दिसतो.ती गडबडीने आईँना आणि बाबांना बाहेर घेउन जायचा प्रयत्न करते.पण त्या पडणार्या बिल्डीँगमध्ये ते दबले जातात.
त्यांना हॉस्पीटलमध्ये सिरीयस अवस्थेत अॅडमिट केलं जातं.आयुषचे बाबा बेशुद्धावस्थेत आहेत पण ते सुरक्षित आहेत.मात्र त्याची आई आणि गिरीजा यांचं आयुष्य धोक्यात आहे.दोघीनांही एकाच प्रकारच्या रक्तगटाच्या रक्ताची नितांत गरज आहे,आणि त्याच रक्तगटातलं रक्त blood bankमध्ये शिल्लक नाहीये.आता त्यांना वाचवण्याचा एकच मार्ग त्याच रक्तगटाच्या व्यक्तीने यांना रक्त दिलं पाहीजे.योगायोगाने आयुषचाही रक्तगटही तोच आहे.पण दोघीँमधल्या एकाच कोणालातरी तो रक्त देऊ शकतो.पण तेही त्याच्या या निर्णयानंतर त्याला त्याचा जीव गमवावा लागु शकतो.कारण मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता त्या दोघींनाही असते,आणि त्यापैकी कोणालाही पुरेल इतकं रक्त जर आयुषमार्फत दिलं गेलं,तर रक्ताच्या कमतरतेमुळे त्याचा मृत्यु होण्याची शक्यता 80%पर्यँत असते.
एकीकडे त्याची आई आणि एकिकडे त्याची भावि पत्नी आहे.....त्याचा निर्णय झालाय,डॉक्टरांनी दिलेल्या त्या फॉर्मवर तो सही करतो.....
आठ तासानंतर...
आयुषच्या वडीलांना शुद्ध येते.त्यांना कोणाच्यातरी रडण्याचा आवाज येत असतो,ते उठुन पाहतात तर ती रडणारी व्यक्ती त्यांची बायको असते.समोर त्यांचा मुलगा आणि त्यांची भावी सुन यांचे एकमेकांच्या हातात हात घातलेले प्रेत पाहुन त्यांना धक्काच बसतो.दवाखान्यातली एक सिस्टर त्यांच्या हातात एक कागद देते.तो कागद वाचुन ते आयुषच्या छातीवर पडुन ढसाढसा रडु लागतात...तो कागद म्हणजे आयुषने लिहीलेलं शेवटचं पत्र असतं.ते पत्र पुढीलप्रमाणे असतं;
आदरणीय बाबा,
मला माफ करा.जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळेल त्यावेळी कदाचित मी या जगात नसेन.पण तुम्ही तिघेही जेव्हा बेशुद्धावस्थेत होता.त्यावेळी मला एक कठोर निर्णय घ्यायचा होता. माझ्या रक्तदानाने एकतर आईचा जीव वाचला असता नाहीतर गिरीजाचा.एका बाजुला मला जन्म दिलेली आई होती.तर दुसर्या बाजुला जन्माची साथ निभावणारी गिरीजा.ए.बाजुला मला चालायला शिकवणारी,परीक्षेत पहीला आल्यावर पेढे वाटणारी,मला बरे नसताना माझ्यासाठी अश्रु ढाळणारी,शर्यतीत पळताना पडल्यावर पुन्हा उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणारी आई,तर दु.बाजुला सुख दुःखाच्या क्षणात साथ निभावणारी,आपलं जगणं मरणं एकत्रच असं सांगणारी,स्टेजवर डान्स करायला जाण्याआधी माझ्या भीतीने थरथरत्या हाताच्या बोटात तिची बोटं रोवुन,मिठी मारुन मला confidence देणारी,आणि माझ्या कोणत्याही निर्णयामध्ये माझी साथ देणारी माझी प्रेयसी गिरीजा होती.शेवटी मी माझं रक्त आईला देण्याचा निर्णय घेतला.मला सांगितलं गेलं होतं की या केसमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासेल आणि त्यामुळे शरीरातील प्रमाणापेक्षा जास्त रक्त घ्यावं लागेल आणि त्यामध्ये माझा मृत्युही होऊ शकतो.माझा हा जन्म जिने मला दिला होता, तिच्याच नावे मी तो करतोय याचं मला फार फार समाधान आहे.माझ्यासाठि आणखी एक समाधानाची गोष्ट म्हणजे जिच्यासोबत मी जगण्यामरण्याच्या शपथा खाल्या होत्या त्या शपथांना जागुन मी मरणानंतरही तिची साथ निभावतोय.ती म्हणजे माझी प्रेयसी. माझ्या या निर्णयात सुद्धा ती नक्की ठामपणे माझ्यासोबत असेल.कारण एक मुलगा आणि एक सखा म्हणुन मी माझी दोन्हीही कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडतोय.मी जातोय गिरीजासोबत मृत्युनंतरचं एक नवं जीवन जगायला,पण तुम्हीही पुन्हा मिळालेल्या या आयुष्याला होकारात्मक दृष्टीनेच पहाल,आणि माझ्यासाठी जास्त काही अश्रु न वाहता,एक नवी सुरुवात कराल अशी मनापासुन वाटतं.मला पुढच्या जन्मी तुम्हां दोघांच्याच पोटी जन्म मिळो अशी मी देवाजवळ पार्थना करतोय....तुमचा काळजीवाहु मुलगा आयुष
.
मित्रांनो याला म्हणतात निर्णय.आयुष्यात शाळा/कॉलेज,जॉब,करियर,प्रेम,लग्न अशा कितीतरी मुद्द्यांच्या बाबतीत आपल्याला tough निर्णय घ्यावेच लागतात.पण हेच निर्णय पुष्कळदा चुकीचे ठरतात.त्यामुळे एखाद्या मुद्याला उपलब्ध सर्व पर्यांयांचा विचार करावा,त्या मुद्द्याचे सर्व कोन लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा म्हणजे तो कधीच चुकणार नाही.अशा प्रकारे घेतलेला कोणताही निर्णय कधीही चुकीचा ठरत नसतो,फक्त तो बरोबर कसा आहे याचं वेळोवेळी स्पष्टीकरण द्यावं लागतं.....
