शोभा आणि निलेश यांनी पाच वर्षाँच्या रिलेशनशिप नंतर breakup केलाय.शोभाचंम्हणणं आहेकी निलेश मला वेळच देऊ शकत नाही तोमला टाळतो.आणि निलेशचं म्हणणं आहे की शोभाचा फोन कायम तिचा दादानाहीतर पप्पाच उचलतात.शोभाच्या फोनला स्पीकर प्रोब्लम असल्यामुळे समोरच्याचा आवाज बदलुन ऐकु येतो त्यामुळे त्याची नेमकी गोची होते.अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांच्यात breakup होतो.काही दिवसांनी दोघांचही मन रमतनसतं.मग शेवटी शोभाला एक उपाय सुचतो.ते म्हणजे फेसबुकवर अकाउंट काढायचं आणि त्यामध्ये मन रमवायचं.शोभा ठरवतेकी आपण दुसर्या मुलीच्या नावाने अकाउंट काढायचं.ती श्रेया पाटील या नावाने अकाऊंट सुरु करते.तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणुन सेट करते.काही वेळातच तिला मुला मुलीँच्या फ्रेँड रिक्वेस्ट येऊ लागतात.त्यांच्यात चॅटीँग सुरु होतं.पण फेसबुकवरील एकाच मुलासंगे चॅटींग करायला तिला खासआवडु लागतं.रंजित देशमुख असं त्या मुलाचं नाव असतं.
सकाळच्या gd morning पासुन झालेली सुरुवात ते रात्री gd n8 पर्यँतचा वेळ देखील त्यांना अपुरा पडायचा.रंजितला श्रेयाच्या बोलण्यातील गोडवा आणि श्रेयाला(शोभा) त्याचा हजर जवाबी पणा खुपच आवडत असतो.जिथे निर्णय हृदयातुन घ्यावे लागतात त्यावेळी श्रेयाची मदत रंजित घेतअसतो,आणि जिथे निर्णय हुशारीने घ्यावे लागतात तिथे रंजितचा सल्ला श्रेया घेत असते.सहा महीन्यांच्या चॅटींग नंतर एकमेकांना ते असे पुरक झालेले असतात.एक दिवसही ते एकमेकांना फेसबुकवर भेटल्याशिवायबोल ल्याशिवाय राहु शकत नाहीत.thatmeans theyr in love.मग शेवटी रंजित तिचा फोन नं घेतो.एकमेकांसोब त फोनवर बोलणं चालु होतं.काही महीन्यातच ते एकमेकांशी भेटण्याची इच्छाही व्यक्त करतात.जवळच्या एयरपोर्टवर भेटण्याचं ठरवतात.एकमेकांना ओळखण्यासाठी रंजित श्रेया पाटील नावाचा बोर्डहातात घेऊन एयरपोर्टवर येतो.आणि ठरल्याप्रमाणे शोभा रंजित देशमुख नावाचा बोर्ड घेऊन तिथेच येते.रंजितला आपल्या नावाचा बोर्ड हातात धरलेली एक मुलगी दिसते आणि शोभालाही श्रेया पाटीलया तिच्या फेसबुक नेमची पाटी घेऊन एक मुलगा आपल्याकडे येताना दिसतो.पण दोघे एकमेकांना जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर भेटतात.तेव्हा त्यांना हसू की रडुहेच कळत नाही.तोंडातलं पाणीच पळतं.डोक्यात हजार प्रकारच्या विजा कडाडतात.कारण श्रेया पाटील आणि रंजित देशमुख हे दुसरे तिसरे कोणी नसुन शोभा आणि निलेश हेच दोघे असतात.ज्यांनी आठ महीन्यांपुर्वी breakup केला होता.नशीब सुद्धा कधीकधी हुकुमाचा एक्काच दाखवतं.ज्याने समोरचा फक्त निरुत्तर होतो.मग नाईलाजाने दोघेही कॅफेबार मध्ये जातात.दोघेही आपापल्या कॉफीकडे बघत पहीला कोण बोलतंय याची वाट पहात असतात.शेवटी निलेश पुढाकार घेऊन तिला म्हणतो,i m so sorry मी फेकअकाउंट काढायला नको होतं.
तीःno i m sorry मी ही फेक अकाउंट काढलंच होतंना...पण तुला माझा आणि मला तुझा आवाज कसा काय नाही ओळखताआला?याचंच आश्चर्य वाटतं.
तोःबहुतेक तु तुझ्या मोबाईलचा स्पीकर प्रॉब्लम अजुन रिपेअर केला नसशील म्हणुनच....
तीः(हसुन)हो बरोबर आहे..,.....,.
एकमेकांशी ते फेसबुकद्वारे खुपच attach झाले असल्यामुळे,अशा प्रकारे पुन्हा एकदा वेगळं होणं त्यांना मान्यनसतं. एकमेकांच्यासमजु तदारपणामुळे त्यांच्यात Patch up होतो,आणि पुन्हा एकदा ते एकमेकांशी relationship मध्ये बांधले जातात....आणि आता तर शोभाने तिच्या मोबाईलचा स्पीकर प्रोब्लम रिपेयर करुन घेतलाय आणितिचा मोबाईल आता फक्त तिच्याजवळचअसतो. ..निलेशही आता शोभाला पुरेसा वेळ देत असतो.....त्यामु ळे फेसबुकमुळे का होईना ते दोघे पुन्हा एकत्र आले...
मित्रांनो prapose केल्याने जोड्या बनत नाहीत किँवा breakup केल्याने त्या तुटतही नाहीत,त्यांचं भविष्य वर लिहीलं गेलेलं असतं.ज्याच्यावि रुद्ध जाऊन तुम्ही ते जोडण्या तोडण्याचं कामनाही करु शकत.एकट्याशी बांधलेला प्रेमाचा दोर कितीही प्रयत्न केला तरीतो तुटत नाही,शेवटी तुम्हाला तिथेच यावं लागतं जिथुन तुम्ही सुरवात केलेली असते.