अशी पाखरे येती .

Wednesday, July 25, 2012

एक कथा- 3



सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. लेले ह्यांचा स्टॉक ब्रोकींगचा बिझीनेस आहे. पैसा अगदी खोऱ्याने ओढतात ते.
गावाकडच्या घराला पण एकदम सुंदर मेंटेन करुन ठेवलं होतं. म्हातारपणी शेवटचे दिवस आपल्याच मातीत घालवायचे ही मनापासूनची इच्छा. इतक्या प्रेमाने बांधलेले ते लहानसे बंगला वजा घर, खूपच सुंदर बांधलेले होते. आता घर बांधलंय, म्हणून सुटीत जाउन रहाणं आलंच. त्यांची मुलगी शितल. इंजिनिअरींग पास केलं होतं आणि आता एमएस ची तयारी करीत होती- लेलेंच्या इच्छे विरुध्द! एकुलती एक मुलगी कायम डोळ्यासमोर रहावी असं आईवडिलांना वाटणं सहाजीकच आहे नाही का?
सध्या मार्केट क्रॅश झालेलं होतं. त्यामुळे फारसं काम नसायचं. या पेक्षा जास्त आयडीयल वेळ सुटी घेण्यासाठी असूच शकत नाही, म्हणून लेले गांवाकडे गेले होते. शितलने गावाला यायला सरळ नकार दिला होता की मला घरीच राहून तयारी करायची आहे म्हणून. बंगल्यात केअरटेकर होताच, त्यामुळे खाण्यापीण्याची सोय तर अगदी चोख होती.
गावी गेल्यावर पण इतर लोकांशी तसा फारसा संपर्क नसायचाच. फक्त भैय्यासाहेब जोशींकडे बाल मित्र म्हणून एखादी चक्कर तरी आवर्जून मारायचे. या वेळेस भैय्यासाहेबांकडे गेल्यावर त्यांनी रोहन बद्दल विचारलं तर भैय्यासाहेबांनी जेंव्हा रोहन बद्दल – नौकरी, इंटरव्ह्यु बद्दल सांगितलं तेंव्हा तर लेलेंना आश्चर्याचा धक्काच बसला!हा मुलगा चक्क मुंबईला आणि चितळ्यांकडे उतरलाय? अरे माझ्या घरी का नाही पाठवलंस त्याला? म्हणुन तक्रारवजा सुरात कैफियत मांडली.
रोहन बद्दल ऐकल्यावर एक विचार आला, की शितलला जर भारताबाहेर जाण्यापासून थांबवायचे असेल तर ह्या रोहनलाच जावई करुन घ्यावा..!! बस्स!! नेकी और पुंछ पुंछ. शितलला तर भैय्यासाहेबांनी लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे दाखवणे वगैरे फॉर्मलिटीजची काही फारशी गरजच नव्हती.
इतका चांगला सोन्यासारखा मुलगा अगदी कुठेच सापडणार नाही ही गोष्ट अगदी सोळा आणे सत्य आहे हे मनाला पुन्हा पुन्हा बजाउन सांगत होते लेले. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला म्हणून निघाल्यावर, भैय्यासाहेबांच्या घरी पोहोचले. भैय्यासाहेब समोरच्या पडवित बसले होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर सहज म्हणून लेलेंनी शितल आणि रोहनच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला!! भैय्या साहेबांचा चेहेरा पण एकदम खुलला. आपल्याला एव्हढी शिकलेली , आणि लहानपणापासून पहाण्यात असलेली मुलगी, सून मिळणार ह्या कल्पनेनेच त्यांना खूप आनंद झाला.
त्यांनी रोहनच्या आईला आवाज दिला, अहो… ऐकलंत कां? हे लेले काय म्हणताहेत ते??
काय? पदराला हात पुसत  त्या बाहेरच्या खोलीत आल्या. भैय्या साहेबांनी लेलेंचं काय म्हणणं आहे ते सांगितलं . शितलला तर त्यांनी पण पाहिलं होतंच. त्यांचा चेहेरा पण एकदम आनंदाने खुलला.  अरे हो… आता रोहन मोठा झालाय की, आणि नौकरी पण लागेलच.
पण लेले …. ती तयार होईल कारे रोहन सोबत लग्न करण्यासाठी? भैय्यासाहेब पुटपुटले..
हो..होईल नां . नाहीतर मी आहे नां!! अरे कसंही करुन तिचं हे अमेरिका खूळ डोक्यातून काढुन टाकायचंय . लग्न झालं की मग ती विसरेल अमेरिका वगैरे, फार तर काय हनिमूनला जा म्हणाव महिना पंधरादिवस!!
नौकरी वगैरे करायची ती भारतामधेच राहून कर म्हणाव!! दोघांच्यापण म्युच्युअल कन्सेंट्स मुळे दोघंही मनापासून खुष झाले होते. बालमित्र आता व्याही होणार म्हणून!! लेले.. जावई मिळणार म्हणून आणि भैय्यासाहेब सुन घरात येणार म्हणून! लेले चहा घेउन घरी परत निघाले- एकच भुंगा मनामधे पोखरत होता- शितल हो म्हणेल की नाही? आणि जर शितल ने हो म्हंटलं, आणि रोहन नाही म्हणाला तर???
भैय्यासाहेब म्हणाले, की रोहनची आणि तिची म्हणजे शितलची  भेट करवून दे मुंबईला. म्हणजे त्या दोघांच्याही ्मनाचा अंदाज घेता येइल.आता ठरलं.. मुंबईला पोहोचलो, की रोहनला सरळ आपल्या घरी न्यायचं, म्हणजे त्याची शितलशी पण चांगली ओळख होईल, आणि दोघं एकमेकांना चांगले ओळखतील आणि पुढचं सगळं सोप्पं होऊन जाईल. मनातल्या मनात कल्पनेचे मांडे खात लेले परत मुंबईला यायला निघाले.
*************************
साडेतिन झाले होते. रोहनचा इंटरव्ह्यु केंव्हाच संपला होता. आत्तापर्यंत तर हे सगळे इंटरव्ह्युज नेहेमी दिल्लीलाच व्हायचे. यंदा पहिली वेळ होती की इंटरव्ह्युज हे मुंबईला अरेंज केले जात होते. आपला दिल्लीला जायचा त्रास वाचला याचाच खूप आनंद झाला होता रोहनला.
इंटरव्ह्यु झाल्यावर रीना ने फोन कर म्हणून सांगितले होते. त्याने सेल फोन काढून रीनाला फोन केला. तिचं काम पुर्ण व्हायचं होतं, पण ती म्हणाली की साधारणपणे एक तासात पोहोचेल. रोहन रिसेप्शन एरीयामधेच बसुन वेळ घालवू लागला- तिच्या कॉलची वाट पहात.
इंटरव्ह्यु झाला होता आणि आता सिलेक्शन झाल्यामुळे परिक्षेचा शेवटचा पेपर झाल्यावर जसा थकवा येतो तसा मानसिक थकवा आला होता. मस्त पैकी उंडारायला जावं, किंवा सिनेमा पहावा – किंवा सगळं काही विसरून मस्त पैकी झोपावं असं तरी वाटतंच… किंवा कोणा बरोबर तरी जे काही मनात आहे ते शेअर करावं असं वाटतं.. पण इथे मात्र रोहन एकटाच बसला होता. बातमी शेअर करायची म्हणून त्याने भैय्यासाहेबांना फोन केला.
सिलेक्शन झालंय बाबा.
भैय्यासाहेबांना उर आनंदाने भरून आला. अहो… ऐकलंत काय?? सिलेक्शन झालं बरं कां.. रोहनचं!!! रोहनची आई बाहेर आली. फोन हातात घेउन डोळ्यातले पाणी घळघळा वहात असतांनाच रोहनला म्हणाल्या..
आशिर्वाद रे.. बाळा!! कधी येतो आहेस घरी परत? लवकर ये रे खूप आठवण येते बघ तुझी!
अग, इथे अजून दोन दिवस तरी थांबावं लागेल. परवा माझी मेडीकल आहे, ती झाली की मला परत येता येईल. अगं आई, पण मला नंतर जॉइन झाल्यावर तर बाहेर जावंच लागेल नां?? मग? इतकी काय काळजी करतेस?
तुला नाही कळायचं रे आईचं मन.. पुटपुटल्या त्या.. आणि फोन ठेवला. पदर डोळ्याला लावला, आणि पाणी टीपलं डोळ्यातलं.
आता रोहनचं लग्नं पण होणार. लेले येउन गेले नां. सून येणार म्हणून एक वेगळीच हुर हुर लागुन राहिली होती त्यांना. कसं होईल? तीचं आपल्याशी जमेल की नाही?
तसंही आपल्याला मुलांकडे जाउन रहायचं नाहीच. कधीतरी थोड्या दिवसांसाठी गेलो, तर तिने व्यवस्थित करावे एवढीच इच्छा.. बस्स! भैय्यासाहेब नेहेमीच त्यांना म्हणायचे , की मुलांकडे जावं, रहावं, पण तिथुन निघतांना मुलांच्या डॊळ्यात आलेलं पाणी पाहिलं की पावलं!!! असं म्हणून परत निघावं!! जास्त राहिलं, तर आपल्या डोळ्यात पाणी येऊन तिथुन निघण्याची वेळ येउ शकते .. ती न येवो म्हणजे झालं. थोडं मन उदास झालं.. कसं होणार ??
उगिच कुठल्यातरी कामात मन रमवायचं म्हणून त्या वाळवणं बघायला परसदारी गेल्या.स्वतःशीच पुटपुटत  त्या तिथे  ठेवलेली काठी उचलुन  त्या तिकडे स्वतःशीच पुटपुटत निघाल्या- मेले कावळे,  येउन सारखे चोचा मारतात, आणि पापड, सांडगी पळवून नेतात.. मागच्या वर्षी तर आंबा  पोळी पण खराब केली सगळी त्यांनी
***************************
रीनाने रोहनचा फोन पाहिला. दोन मैत्रीणी मिळून ते प्रोजेक्ट पुर्ण करायचं होतं म्हणुन ती मैत्रिणीकडे आली होती.  आता काम पुर्ण होत आलं होतं, रोहनचा फोन आला आणि तीने आवरतं घेतलं आणि तिथुन निघाली. दुपारची वेळ, म्हणजे अशा वेळी थोडा ट्राफिक कमीच असतो. ती एकदम लवकर पोहोचली ताजच्या समोर. तिथे पोहोचल्यावर तिने रोहनला फोन करून सांगितले की ती बाहेर  उभी आहे म्हणून.
रोहन बाहेर आला. चेहेरा थोडा थकलेला होता. इंटरव्ह्यु चांगला दोन तास चालला. जेवण वगैरे काहीच झालेलं नव्हतं. तो बाहेर आला आणि कार कडे चालू लागला. समोरच्या सिट वर जाउन बसला रीनाच्या शेजारी.थोडा थकवा जरी असला तरी पण प्रसन्न चेहेरा पाहिल्यावर रीनाच्या लक्षात आलं की ह्याचा इंटरव्ह्यु चांगला झालाय म्हणून.
कार सुरु झाली. रोहन म्हणाला, कुठे जवळपास एखादं हॉटेल आहे कां? लंच करायचा राहून गेलाय. रीनाने आश्चर्याने पाहिले- काय?? जेवला नाहीस तू??  ठिक आहे, आणि कार पुल ओव्हर केली मरीना हॉटेल समोर. व्हॅले पार्किंग वाला माणुस समोर आला आणि कार घेउन गेला पार्किंगला. दोघंही हॉटेल मधे शिरले. वरच्या मजलयावर गेल्यावर समुद्रासमोरची खिडकी समोर असलेला टेबल घेतला. समोर अरबी समुद्र पसरलेला होता. रीनाच्या फेवरेट जागांपैकी ही एक जागा होती. तिचे पपा तर इथे आले की तासनतास समुद्राकडे पहात बसु शकतो मी.. असे म्हणायचे.
काय घेणार आहेस तू?
हं.. मी .. चिझ सॅंडविच आणि कॉफी.. बस्स!
अरे पण तू जेवला नाहीस नां? मग ? कसं होईल एवढ्याने तुझे?  आणि तिने कॉफी ऐवजी मॅंगो शेक मागवला. वेटरने डिश समोर आणून ठेवली. रोहनने खाणं सुरु केलं. रीना ने स्वतःसाठी कॉफी मागवली होती. तिला अजूनही रोहनशी कसं बोलावं हे समजत नव्हतं. समोरचा कॉफीचा कप थंड होत होता..
’तुला अजून काय हवंय?’
’ नाही..बस , इतकंच पुरे मला. ’ रोहन  म्हणाला.
थोडं खाऊन दोघंही तिथुन निघाले . थोडं पोटात पडल्याने आणि  नौकरी पक्की झाल्यामुळे रोहनला आता बरं वाटत होतं.   रीनाने आपल्याच विचारात मग्न होती, कदाचित म्हणूनच असेल की तिने  इंटरव्ह्यु बद्दल काहीच विचारलं नाही.  रोहन शांत बसला होता.
रीनाच्या मनात कालच्या एपिसॊड पासून एक गिल्टी कॉन्शस होता. रोहनने आपल्याला, ’तशी’ मुलगी समजू नये असे सारखे वाटत होते. काल रात्री तो जेंव्हा खोलीत आला, आणि कांही न बोलता, परत निघून गेला, तेंव्हा मात्र त्याच्या डिसेन्सीची खात्री पटली . तिच्या लक्षात आलं होतं की रोहनचा कालचा तिच्या खोलीत शिरण्याच्या उद्देश केवळ तिला रडतांना पाहून सपोर्ट करण्यासाठीच होता. नाही तर, रोहन ती शांत होऊन  बाथरुम मधे गेल्यावर परत येई पर्यंत थांबला असता.
आणि ….. कदाचित………………….!!
!! इतक्या  एकमेकाविरोधी   गोष्टींचा कल्लोळ सुरु होता डोक्यात.
एखाद्या माणसाने आपल्याला मिस़अंडरस्टॅंड करु नये असे का नेहेमी वाटत असते आपल्याला? आता रोहनने आपल्याला मिस़अंडर्स्टॅंड जरी केली तरी काय फरक पडतो आपल्याला? दोन दिवसांनी तो परत जाणारच आहे नां? पण दिमाग मान जाये लेकिन दिल ना माने.. अशी परिस्थिती झाली होती तिची.
एक काम करू या.. रोहनचा इंटरव्ह्यु झालाय. म्हणजे आता  हा उद्या परत जाईल बहुतेक. मग ऍज अ गुड विल जेस्चर, त्याला मुंबई फिरवून मग घरी नेउ या आपण.. ठरलं!! रात्री  ८ वाजता पिझा हट वर भेटायचंय सगळ्या मित्रांना, तेंव्हा रोहनला पण बरोबर ठेउ या. त्याला पण जरा बरं वाटेल.पण आता तर फक्त चार वाजले आहेत, ८ पर्यंत काय करायचं?? बांद्रा बॅंड स्टॅंड…?? येस्स!! चलेगा, तिने स्वतःशीच म्हंटलं! घरी फोन लावला, सुमाताईंना.. की रात्री उशिर होईल, पण काळजी करु नकोस रोहन सोबत आहेच!
वरळी सी लिंक वरुन कार जात होती, रीनाची सवय होती, सी लिंक वरुन जातांना एसी बंद करायचा,  खिडक्यांच्या काचा खाली करायच्या, आणि समुद्राची खारीहवा चेहेऱ्यावर झेलायची.समुद्राच्या वाऱ्याने केस उडत होते. डिओ चा म्ंद सुगंध कारमधे पसरला होता.रोहन पण बाहेर पहात होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, आणि एकदम जोरात ह्सू आलं  दोघांनाही..
काल रात्रीच्या प्रसंगा मुळे  निर्माण झालेली   भिंत एकदम ढासळली दोघांच्या मधली.. !!

एक कथा- २


एक कथा- २

राजाभाऊ बॅग उचलून गेले ऑफिसमधेसुमाताई विचार करीत बसल्या होत्या.चेहेऱ्यावर चिंताग्रस्त भाव अगदी सहज ओळखू येत होते. रोहनला त्यांच्याकडे बघुन काय झालं असावं  याचा अंदाज येत नव्हता.
रोहनने विचारलेकाय झाले?
अरे स्वयंपाकवाल्या बाई आलेल्या नाहीत आज, आणि मला पण सांधेदुखी मूळॆ काहीच करता येत नाही..सांग तुच काय करणार??
त्यात काय विशेषमी तुम्हाला मदत करुमला येतं सगळं करता...कपाळावरुन इस्त्री फिरवल्याप्रमाणेसुमाताईंच्या कपाळावरच्या आठ्या कमी झाल्या थोड्या, की तसं वाटलं रोहनला??
सुमाताईंनी मनातल्या मनात विचार केला, ” काय हरकत आहे थोडी मदत केली तरइथे आपल्या घरीचतर रहाणार आहेकरेल थोडं काम..तसंही त्याला सवय आहे म्हणतोय कामाचीकरेल थोडं काम दोन तिनदिवसत्याचा इंटरव्ह्यु पण दोन दिवसानंतर आहे म्हणे.”
बरं… काय करता येतं रे तुला रोहन?
सगळा स्वयंपाक येतो करताअगदी सगळं!!!
सुमाताईंचा चेहेरा उजळलारोहनला घेउन त्या किचन मधे गेल्यात्याला सगळं दाखवलंम्हणजे जेवढंसुमाताईंना माहिती होतं तेवढंच..
रोहनने साधा आमटी भात बनवलापण सुमाताई एकदम खुशचला सोय झाली आपली
********************************************************************
सकाळची वेळ होती . चितळे ब्रेकफास्ट टेबलवर रोहन सोबत बसले होतेनेहेमी प्रमाणे सुमाताई बटर घेउनटोस्टला लावित होत्याआज नेमकं लो फॅट बटर लावलं.. चितळ्यांनी मनातल्या मनात निश्वास सोडलाआणि सुमाताईंनी दिलेला तो टोस्ट् आणि अंड्यातल्या पांढऱ्या बलकाचं ऑम्लेट समोर डीश मधे घेतलं.
रोहन तुझा इंटरव्ह्यु कुठे आहे रे?रोहनने उत्तर दिलं की उद्या सकाळी ताज मधे आहे .ताज मधे म्हंटल्यावर चितळ्यांना ताज मधे कुक किंवा बेल बॉय वगैरे म्हणून काहीतरी असेल असेच वाटले.काल रात्रीचा रोहनचा स्वयंपाक त्यांनी पण चाखला होताचत्यामुळे कदाचित हा तिथे कुक म्हणुनच जातअसावा असा विचार आला त्यांच्या मनातपण सरळ विचारलं तर वाईट दिसतंम्हणुन काही विचारलंनाही.
रोहनच्या राजबिंड्या रुपाकडे बघुन त्यांना थोड वाईट वाटलं ,  पण त्याना दुर्लक्ष करणं  योग्य वाटलं ,उगिच एखाद्याचा अपमान कशाला करायचा?? पण मित्राच्या मुलासाठी काही करता आलं तर बरं होईलअसंही वाटत होतं चितळ्यांना!*********************************************************************************
संध्याकाळचे पाच वाजले होतेरीना बाहेर निघायला तयार झाली होतीसुमाताईंनी विचारलं कुठे जातेआहेस ?? अगं सिनेमाला जायचंय रात्रीच्या जवळच्याच मॉल मधे जाणाराय आम्ही सगळेपैसे आहेतकां??? की हवे आहेत गंसुमाताईंनी विचारलं.
रोहन सोफ्यावर अभ्यासाचं वाचत बसला होतात्याला वाटत होतं की ’सात च्या आत घरात ’संस्कृतीआपली आणि ही तर सातवाजता बाहेर पडतेमुंबईचं आयुष्य हे असंच असावं..
रीना बाहेर पडली आणि टॅक्सी करुन सरळ मॉल समोर गेलीसगळा गृप उभा होता. तिला वाटलं की साडेसातचा शो आहे  , पण सिनेमा पहायचा प्रोग्राम होता रात्री दहाचा – नाईट शो चातो पर्यंत एक नविनहॉटेल निघालं आहे तिकडे जायची टूम निघालीखाणं झाल्यावर सिनेमा पाहून रात्री साडेअकरा वाजतासिनेमा संपल्यावर ती घरी परत आलीसुमाताईंचा पारा चढलेला होतारात्री १२ वाजता म्हणजे काययायची वेळ आहे आहे कां ?? सिनेमाला तु पाच वाजता गेली होतीसरात्री  पर्यंत तु घरी यायला हवं होतंइतका वेळ कां लागला तुला? आणि बराच वेळ त्या रागावत होत्या रीनाला.
रीनाला रोहन घरात वरच्या खोलीत असतांना आईचं रागावणं इन्सल्टींग वाट्त होतं – त्याला ऐकायलाजाईल नां?? ममा पण ना .. एकदमच ही आहे……… पण चुक तर झाली होतीच.. ऐकुन घेणं भाग होतंच.रोहन गेस्ट रुम मधे मान घालुन उघडे असलेले कान बंद करुन आपलं लक्षंच नाही असं दाखवत पुस्तकाततोंड खुपसुन बसला होता.
*******************
रीना आपल्या खोलीत शिरलीति काही  बोलता कपडे चेंज  करता सरळ पलंगावर आडवी पडून हमसुनहमसून रडू लागली.
आज त्या हॉटेलमधे सगळ्यांनी मिळून हुक्का मागवला होतागम्मत म्हणून ओढायला काय हरकत आहे?सगळ्यांनी खूप आग्रह पण केला होतातरीही तिने मात्र त्याला अजिबात हात लावला नव्हता.
हॉटॆलमधल्या त्या हुक्का प्रकरणानंतर आपण या गृप मधे आलोय ही चुक तर नाही ? असे विचार सारखेडोक्यात येत होतेआज हुक्काउद्या सिगरेटकिंवा नशा असलेली वस्तू….. काहीही होऊ शकतंस्पाइक्डड्रिंक्स च्या न्युज तर अगदी कॉमन झाल्या होत्यात्यामुळे कुठेही काहीही घेतांना सेफ वाटत नव्हतं.
सिनेमा पहातांना पण गौरवने आणुन दिलेला पेप्सी चा ग्लास तिने  पिता तसाच ठेवला होतागौरव च्याशेजारी बसल्यावर त्याचा येणारा सिगरेटचा वास नकोसा होत होतासिगरेट आणि आफ्टरशेव्ह यांचामिक्स वास सेक्सी असतो असं ऐकलं होतंपण ते आज चुकीचं आहे हे समजलंपुन्हा या गृप मधे यायचंनाही हे मनोमन निश्चित केलंत्याचा होणारा सहेतुक स्पर्श पण नकोसा वाटत होता.अंग चोरून बसलीहोती ती सिनेमा संपेपर्यंतसगळे मित्र मैत्रीणी बरोबर आहेत म्हणुन तिने सिनेमा पुर्ण पाहिला आणि रात्रीघरी यायला निघालीघरी पोहोचल्यावर आई रागावेलच याची खात्री होतीचपण आता चूक केली आहेच तरभोगावे लागेलच.. !!
*******************************************
रात्री एक वाजता रोहनला जाग आली आणि तो पाणी प्यायला म्हणून किचन कडे निघाला . जातांनारस्त्यामधे रीनाच्या खोलीचे दार उघडे होतेती कपडे वगैरे  बदलता पलंगावर आडवी पडुन अजूनहीरडतच होती.टेबलावर फेकलेली तिची पर्सत्यातुन बाहेर पडलेलं मेकपचं सामान.. टिशर्ट थोडा वरसरकलेला. .. काय करावं?? रोहनला काय करावं ते सुचत नव्हतं , त्या खोली मधे जावं आणि तिची समजूतकाढावी की आपला काय संबंध म्हणून दुर्लक्ष करुन पुढे निघुन जावं??अजून दोनच दिवस तर रहायचय इथेआपल्याला.
शेवटी माणूसकीचा विजय झालारोहन तिच्या खोलीत शिरला आणि पलंगाशेजारी अवघडून उभा राहिला.पलंगावर तिच्या शेजारी बसणं त्याला संयुक्तीक वाटत नव्हतंमुलिंना जात्याच एक सिक्स्थ सेन्स असतोरीना पटकन उठुन आपले कपडे सारखे करु लागलीरोहनला काय बोलावं तेच सुचेना..
रीना आता मात्र थोडी शांत झाली होती एक परका पुरुष आपल्या खोलीत ही भावनाच तिला शांत करण्यासपुरेशी होतीती त्याच्या कडे पहात होती.. रोहनच्या नजरेत एक सपोर्टिव्ह भावना  सांगता दिसत होतीतीउठुन उभी राहिली आणि बाथरुम कडे निघाली तोंडावर पाणी मारुन परत येई पर्यंत रोहन आपल्या रुम कडेनिघुन गेलेला होता आणि तीला उगीच हसु आलं.. दार बंद केलं आणि ती कपडे चेंज करायला निघाली.
**********************************************************************************
आज मात्र सुमाताईंना खूप टेन्शन असतंआमटी भात , किंवा भाजी पोळी बनवणे इतपत तर ठिक आहे,पण दुपारच्या किटी पार्टी साठी स्नॅक्स बनवणे जमेल का त्याला?? त्या किचन मधे शिरतात की रोहननेकाय करुन ठेवले आहे ते बघायला.
रोहन तर तिथे नव्हता पण दोन भांडी मात्र व्यवस्थित झाकुन ठेवलेली होतीकिटी पार्टी ठरल्याप्रमाणेझालीसुमाताईंचा जीव मात्र एकदम भांड्यात पडलारोहनला तर यामधे काहीच माहिती नव्हतंतो वररुमवर बसुन आपला अभ्यास करीत होताउद्या सकाळी इंटरव्ह्यु !! टेन्शन आलं होतं डोक्यावरजमेल कांआपल्यालारिटन एक्झाम तर पास झालो आपणलोकं म्हणतात मराठी मुलं का नाहीत या क्षेत्रात?जमेल का आपल्याला उत्तरं देणंरात्र भर डोळ्याला डोळा लागला नाही रोहनचासकाळी  वाजताच पुन्हाअभ्यासाला बसला.
गेल्या दोन दिवसांच्या दिनचर्ये प्रमाणे , तो ब्रेकफास्टला टेबल वर जाउन बसलारीना , आणि चितळे दोघंहीतिथेच होतेरोहनची वाट पहातरोहन ओशाळवाणं हसलासॉरी म्हणून त्यांच्या सोबत बसलासगळे जणशांत होतेशेवटी चितळे म्हणाले की माझ्या शुभेच्छा रे तुला.. काही मदत लागली तर सांग मलानुसतंस्माइल देऊन त्याने टाय समोर केलामला नॉट बांधून द्या म्हणून.. आणि सगळे एकदम जोरात हसायलालागतात काल रात्रीच्या टेन्शनचा मागमुस पण शिल्लक राहिला नव्हता….
चितळे म्हणाले, ’काय रे किती वाजता आहे तुझा इंटरव्ह्यु?’
एक वाजता.. ” रोहनने उत्त्तर दिलं.
कसा जाशिल?लोकलने जाईन म्हणतोयथोडा चाचरतच म्हणाला तोलोकलची गर्दी बघुन त्यात आपल्याला चढता येईलकी नाही याची शंका होतीच त्यालाही गोष्ट चितळ्यांच्या लक्षात आलीत्यांनी म्हंट्लं, रीनाअगं तुलाजायचं होतं ना मरीन लाइन्सलाप्रोजेक्ट वर काम करायला?? तूच का नेत नाहीस याला कारने तुझ्यासोबतमित्राच्या मुलाची किमान एवढी तरी मदत करावी ….
रीना आज घरीच होती. ’ ठिक आहेमाझं पण काम होऊन जाईलजातांना ह्याला पण घेऊन जाईन मी.आणि येतांना परत पण घेउन येईनरोहनचा चेहेरा एकदम उल्हासित झालामुंबई बाहेर रहाणाऱ्यामाणसाला जर लोकल चा प्रवास टळणार आहे असे सांगितले तर त्याला किती आनंद होईल तेवढाच आनंदझाला होता रोहनला पण..
*********************************************************
रोहनच्या कालच्या सेंटिमेंटल सपोर्ट साठी त्याला थॅंक्स म्हणायलाच हवेघरी तर तो नेहेमी पुस्तकातचबुडलेला असतोकाय करावं बर?? त्याला कार ने नेते म्हंटलं तर तो कदाचित नाही म्हणेलपण पप्पांच्यासमोर तो नाही म्हणणार नाहीम्हणूनच ब्रेकफास्टच्या वेळेस पप्पांनी त्याला नेण्याचा विषय काढलात्यानेजेंव्हा आनंदाने होकार दिलातेंव्हा तिला खूप खूप बरं वाटलं. “थोडं लवकरच निघू याम्हणजे ट्रॅफिकचा इशु रहाणार नाहीरोहन  बोलता तयार झालात्याने सकाळीबांधलेला टाय थोडा वाकडा लागला होतानॉट थोडी वाकडी दिसत होती.तिने कार सुरु केली , टाय बद्दल सांगावं का?? तिने आपणच पुढे होऊन ती नॉट सरळ करुन दिलीआणिदोघंही निघाले ताजच्या दिशेनेएकही अक्षर  बोलता कार चालवत होती रीनारोहन रस्त्यावरची गम्मतबघत होता.त्याच्या चेहेऱ्यावरचा टेन्शन  सांगता कळत होतंत्याचं रीना कडे लक्ष पण नव्हतंइंटर्व्ह्युच्याटेन्शनचा परीणाम त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता.
तुमच्यात बोलत नाहीत कां मुलींशी??अं..??? नाही तसं नाही गं.. इंटरव्ह्यु द्यायचाय नां..म्हणुन थोडं टेन्शन आहे झालं
हं..!! मग त्यात काय एवढंनौकरी मिळेल नां.. नाहीतर दुसरीकडे कुठेतरीपण एक विचारू कातु मराठीमधे एम  का केलंस?? त्या ऐवजी एखाद्या प्रोफेशनल विषयात का नाही ग्रॅज्युएशन केलं म्हणजे चांगलीनौकरी मिळाली असती?केविलवाणं हसला रोहन.. काही  बोलतापण चेहेऱ्यावरचे भाव मात्र अजूनही नॉर्मल आले नव्हतेतिनेत्याच्याकडे आज पहिल्यांदा निरखून पाहिलंतीला वाटलं की आपण चुकीचा प्रश्न विचारलाय त्यालातिनेलगेच विषय बदलला.
तेवढ्यात कार ताज समोर पोहोचलीकार थांबवली , आणि रोहन खाली उतरलाकिंचीत बावरलेलामागेवळून पाहिलं तर रीना अजूनही तिथेच उभी होती कार ची खिडकी उघडून तिने त्याला थम्स अप ची साईनकेलीथोडा हसला तो.
त्या पंचतारांकीत हॉटेलच्या दारामधे शिरल्यावर तिथला गारवा अगदी हाडापर्यंत स्पर्शुन गेला.
*****************************************************************************
सुमाताई एकट्याच घरात बसल्या होत्याचितळे गेले होते ऑफिसलाकालच्या रीनाच्या रात्री उशिरायेण्याच्या प्रसंगामुळे त्यांना अचानकपणे रीनाची काळजी वाटू लागलीआता लग्नासाठी मुलं पहायला सुरुकरावं लागेलएकुलती एक मुलगी म्हणजे खरंच किती काळजी असते नाही?रोहीणीमधे जाउन नांव नोंदवावे लागेल एकदाउद्याच जाउ यामुलगा शक्यतो भारतातला असलातरबरं.. कमीत कमी नजरेसमोर तरी राहिल पोर!